Deepali Sayed Latest News
Deepali Sayed Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : अजूनही वेळ गेलेली नाही; दिपाली सैय्यद यांचं दोन्ही बाजूंच्या नेत्यांना आवाहन

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंखोरी केल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिंदेच्या बंडखोरीनंतर सर्वात जास्त फटका हा शिवसेनेला बसला असून शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. अशात शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद (Deepali Sayed) यांनी शिवसेना आणि शिंदे गटातील या दोन्ही बाजूच्या नेत्यांना पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. दिपाली सैय्यद यांनी एक फोटो ट्विट केला आहे, ज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्र बसलेला फोटो शेयर केला आहे. तसेच "राग रूसवे विसरून कुटूंब वाचवा!" असं आवाहन करत चर्चा तर झालीच पाहिजे अशी सल्लावजा विनंती त्यांनी शिवसेना नेत्यांसह शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना केली आहे. (Deepali Sayed Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर दिपाली सैय्यद यांनी दुःख व्यक्त केले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जोडी श्रीरामारासखी आहे असं दिपाली सैय्यद म्हणाल्या होत्या. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावं असं त्या वारंवार दोन्ही बाजूंच्या नेत्यांना सांगत आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना नेत्यांना आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना एकत्र येण्यासाठी दिपाली सैय्यद यांनी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. दिपाली सैय्यद म्हणाल्या की, "दोन्ही बाजूच्या आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही, वेळेच्या आगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे ते वेळेवर अजुनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटूंब वाचवा! चर्चा तर झालीच पाहिजे" असं ट्विट करत त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. सोबतच शेकडो शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्ते हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनेही अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या या आदेशाला अवैध ठरवले आहे, त्यामुळे शिवसेनी नक्की कुणाची असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे दिपाली सैय्यद यांनी केलेल्या आवाहनाला शिवसैनिक आणि शिंदे गटातील नेते प्रतिसाद देतील का हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

Foods for Skin and Weightloss: रात्री 'या' फळांचे सेवन केल्यास त्वचेसोबत वजन राहिल नियंत्रणात

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT