या सरकारमुळे शेतकऱ्यांवर फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्या करण्याची वेळ- फडणवीस Saam Tv
मुंबई/पुणे

या सरकारमुळे शेतकऱ्यांवर फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्या करण्याची वेळ- फडणवीस

फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या केलेल्या पंढरपूर मधील सूरज जाधव या शेतकऱ्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लक्षवेधीद्वारे विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या केलेल्या पंढरपूर मधील सूरज जाधव या शेतकऱ्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लक्षवेधीद्वारे विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर (government) अनेक गंभीर आरोप केले आहेत. या सरकारने शेतकऱ्यांवर आता फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्येची करण्याची वेळ आणल्याची ते यावेळी म्हणाले आहेत. (time farmers to commit self slaughter through Facebook Live this government)

हे देखील पहा-

तसेच शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज कापणे याक्षणी बंद करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. मी त्या शेतकऱ्याच्या (farmer) घरच्यांशी बोललो आहे. ज्यावेळी पिकाला पाण्याची आवश्यकता असते. त्यावेळी मात्र कृषीपंपाची वीज कट केली असल्याचे शेतकऱ्याच्या घरच्यांनी यावेळी सांगितले आहे. बीडमध्ये (Beed) देखील एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचेही कृषी पंपाचे कनेक्शन कापले होते असे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

रोज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा या सरकार नी लावला आहे. हे शेतकरी आत्महत्या करत आहेत. काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये आहेत. गेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणार नाही. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री आजिबात ऐकत नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

ऊर्जामंत्री जाहीर बोलतात की वीज बील भरले नाही, तर वीज कट करु असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. सध्या राज्यामध्ये सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु आहे. या राज्यात फेसबुक लाईव्ह करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ सरकारमुळे येत आहे. यामुळे आमची विनंती आहे की, तत्काळ वीज तोडणी थांबवावी. अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याने आतम्हत्या केली आहे. मग चर्चा कुठे करायची? असा प्रश्नही फडणवीस यांनी केला आहे. यामुळे याक्षणी तत्काळ वीज तोडणी थांबण्याचे आदेश द्यावेत असे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT