वाघ- बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक सागर आव्हाड
मुंबई/पुणे

वाघ- बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक

पुणे वन विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग(पश्चिम) मुंबई यांची मोठी कारवाई

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुणे वन विभागाच्या चमूद्वारे भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील मौजे वारजे येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून, बिबट प्रजातीच्या कातडीची तस्करी करणाऱ्या ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई दरम्यान एक बिबट कातडी हस्तगत करण्यात आले आहे. २ चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सदर आरोपी ना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या, आरोपींची सखोल चौकशी केली असता आणखी २ कातडीचा व्यवहार होणार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने दिनांक 15/9/ 21 या दिवशी सकाळी एक बिबट आणि एक वाघ सदृश्य कातडीचा व्यवहार करताना 5 आरोपींना सासवड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दरम्यान २ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

उपरोक्त कारवाई पुणे वन विभागचे उपवनसंरक्षक श्री राहुल पाटील (भा.व.से.) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबईचे विभागीय उपसंचालक श्री योगेश वरकड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रदिप संकपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा, वैभव बाबर वनपाल, सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, रईस मोमीन, परमेश्वर वाघमारे, योगेश कोळी, अमोल साठे, अमोल गुरव आणि डोकी आदीमलया वन्यजीव निरीक्षक आणि हवालदार विजय नांदेश्वर, सोपान मोहन या पुणे वनविभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. सदर वन गुन्ह्याचा पुढील तपास श्री राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे आणि मयूर बोठे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे .

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT