Accident; कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यु

पुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघात मध्ये वारजे येथील २ तरुणांचा मृत्यु
Accident; कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यु
Accident; कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्युSaam Tv

पुणे : कर्वेनगर या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघात मध्ये वारजे येथील २ तरुणांचा मृत्यु झाला आहे. शंकर इंगळे (वय- २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय- २०) दोघेही रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी अशी मृत्यु पावलेल्याची नावे आहेत. हा अपघात कर्वेनगर उड्डाणपुलावर बुधवारी रात्री ११:३० च्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन होळकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घराच्या गणपतीची आरती करुन, दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्याकरिता दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे ते वेगाने कर्वेनगर उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरील वळणावर दुचाकीवर नियंत्रण सुटल्याने, त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला जोरात धडकली. यानंतर ती तशीच पुढे गेली.

Accident; कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यु
औरंगाबाद मध्ये हल्लेखोरांचा हैदोस; घटना CCTV मध्ये कैद

तिने नंतर पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्याला जोरात धडक दिली. अपघाताच्या आवाजाने जवळ असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी धावत घटनास्थळी पोहचले. परंतु, हा अपघात इतका जोरात झालेला आहे की, त्यामध्ये दोघांच्या चेहर्‍याचा चेंधामेंदा झाला आहे. पोलीस पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यु झाला होता. सलील कोकरे हा शिक्षण घेत होता तर, शंकर इंगळे हा पाण्याचा टँकर पुरविण्याचा व्यवसाय करत होता. दोघांच्या अकस्मात मृत्युमुळे वारजेत मोठी शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com