kalamb Beach Saam Tv
मुंबई/पुणे

समुद्रात पोहायला गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि...

चेतन इंगळे

मुंबई : निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमीच समुद्र किनाऱ्यावर विसावा घेण्यासाठी जातात. पण समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि दुर्देवाने (water drowning) पाण्यात बुडाल्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर (Nalasopara Beach) घडल्याचं समोर आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले तीन तरुण समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक आणि निखित निजाई यांनी जीवाची पर्वा न करता समुद्राच्या पाण्यात जाऊन दोन तरुणांना वाचवलं. परंतु, एकाचा दुर्देवाने मृत्यू झाला. सईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०)आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) यांना जीव वाचला. तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित, राहुल आणि राजन हे तिघेही समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी समुद्राल आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन जीवाची पर्वा न करता दोघांना रोहित आणि राहुलला वाचवले. पण दुर्देवाने त्यावेळी राजन पाण्यात सापडला नाही. आज दुपारी एकच्या सुमारास राजनचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळला. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT