Breaking: आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणात आणखी तिघांना अटक ! - Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणात आणखी तिघांना अटक !

पुणे सायबर पोलिसांनीची कारवाई...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्य विभागामार्फत (Health Department) गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबरच्या रात्रीच फुटल्याचा प्रकार घडला होता. याबद्दलची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. याच पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका संशयीताला (ता. १ डिसेंबर) रोजी ताब्यात घेतलं होत. आता आज पुन्हा आरोग्यभरती प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे काल दोन आणि आज एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बबन मुंढेने विजय मुऱ्हाडेला भरतीचा पेपर दिला होता. तर, सुरेश जगताप- क्लास चालक, आणि अनिल गायकवाड जो विजय मुऱ्हाडेचा साथीदार आहे. असे अटक झालेले तीन आरोपी आहेत.

दरम्यान, याआधी ताब्यात घेतलेला संशयित हा 28 वर्षांचा तरुण असुन त्याला औरंगाबाद (Aurangabad) मधून ताब्यात घेण्यात आलं होत. पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर सेलने ताब्यात घेतलं त्याच्याकडे पेपर सापडला होता. पेपर कसा हातात आला याचा तपास सुरु करण्यात येत होता. तर ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव विजय मुऱ्हाडे असे होते. व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेवर या आरोपीचं नाव होतं. बॅंकीग तसेच पोलिस भरती घोटाळ्यातही त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होते.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गैरप्रकार झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांसह राज्यातल्या विरोधी पक्षाने या परीक्षेतील सावळ्या गोंधळावरून राज्य सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना धारेवर धरले होते.

आरोग्य विभागामार्फत गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबर च्या रात्रीच फुटल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ उडाला होता. पेपर फुटीच्या या गंभीर प्रकाराने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT