Breaking : आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी एक संशयीत ताब्यात !

पेपर कसा हातात आला याचा तपास सुरु,....
Breaking : आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी एक संशयीत ताब्यात !
Breaking : आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी एक संशयीत ताब्यात !Saam Tv

प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्य विभागामार्फत (Health Department) गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबरच्या रात्रीच फुटल्याचा प्रकार घडला होता. याबद्दलची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. याच पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी अखेर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणीच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका संशयीताला ताब्यात घेतलं आहे. संशयित हा 28 वर्षांचा तरुण असुन त्याला औरंगाबाद (Aurangabad) मधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर सेलने ताब्यात घेतलं त्याच्याकडे पेपर सापडला होता. पेपर कसा हातात आला याचा तपास सुरु आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तर ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव विजय मुऱ्हाडे आहे. व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेवर या आरोपीचं नाव होतं. बॅंकीग तसेच पोलिस भरती घोटाळ्यातही त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गैरप्रकार झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांसह राज्यातल्या विरोधी पक्षाने या परीक्षेतील सावळ्या गोंधळावरून राज्य सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना धारेवर धरले होते.

Breaking : आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी एक संशयीत ताब्यात !
Breaking : आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल! पाहा Video

आरोग्य विभागामार्फत गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबर च्या रात्रीच फुटल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ उडाला होता. पेपर फुटीच्या या गंभीर प्रकाराने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com