Mumbai Latest News Update Saam TV News
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत नेमकं चाललंय काय? रुग्णालयात ३ महिन्यांच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

Mumbai infant death Chembur news : मुंबईतील चेंबूरमध्ये तीन महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चुकीच्या इंजेक्शनचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Latest News Update : चेंबूरमधील तीन महिन्यांच्या मुलीचा शीव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Mumbai baby death hospital negligence case)

चेंबूरच्या खारदेव नगर परिसरात राहणारे रवी कोल्हे यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला ३ फेब्रुवारी रोजी अचानक खोकला आणि ताप आल्याने तिला प्रथम गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारांनंतर पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला शीव रुग्णालयात हलविण्यात आले. सुरुवातीला मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या एका इंजेक्शननंतर अचानक मुलीची प्रकृती खालावली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांविरोधात लोकांमध्ये राग दिसून आला.

दरम्यान, संतप्त कुटुंबीयांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fire Breaking: मोठी दुर्घटना! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Jio Recharge: खुशखबर 200 रुपयांत मिळणार 30 जीबी टेडा अन् बऱ्याच सुविधा, लगेचच वाचा प्लान

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

IND vs NZ series 2026: 40 दिवस आणि 12 सामने; पाहा कसा असणार टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

ओले केस टॉवेलने गुंडाळणे योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT