मुंबई वगळता अन्यत्र तीन सदस्यीय प्रभाग पालिका निवडणूक (पहा व्हिडीओ) SaamTV
मुंबई/पुणे

मुंबई वगळता अन्यत्र तीन सदस्यीय प्रभाग पालिका निवडणूक (पहा व्हिडीओ)

महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग पद्धत असणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : राज्यात महापालिका (Municipal Corporatioल) आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग पद्धत (Multi-member ward method) असणार असा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळामध्ये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय (State Cabinet Decision ) घेण्यात येणार असल्याचे समजते आहे. (Three-member ward municipal elections except Mumbai)

हे देखील पहा -

राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची (NCP) दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका होती, तर शिवसेनेची (Shivsena) चार सदस्य असावा अशी मागणी होती मात्र अखेर तीन सदस्य प्रभाग पद्धतीला मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांमध्ये दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) यांची होती तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) ही सदस्य संख्या चार असावी अशी मागणी होती अखेर या दोन्हींचा सुवर्णमध्य म्हणजेच यामध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. आत्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या बैठकी नंतर जाहीर करणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT