लसीकरणचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा; मुख्यमंत्र्यांची सूचना!

लसीकरणामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते.
लसीकरणचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा; मुख्यमंत्र्यांची सूचना
लसीकरणचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा; मुख्यमंत्र्यांची सूचनाSaamTV

रश्मी पुराणीक

मुंबई : राज्यात काल 21 सप्टेंबर रोजी सुमारे 36 लाख कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine Dose) शिल्लक राहिले असून ज्या जिल्ह्यांमध्ये कमी डोसेस दिले असतील त्यां जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. (Chief Minister suggested speeding up vaccination)

हे देखील पहा -

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) झाले असले तरी आता राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपुर्वी नागरिकांची लसींसाठी मागणी असायची मात्र लसी उपलब्ध नव्हत्या मात्र आता लसी उपलब्ध आहेत पण योग्य प्रमाणात लसीकरण होत नसल्याने काल दि. 21 सप्टेंबरला राज्यात जवळपास 36 लाख लसींचे डोस शिल्लक आहेत यामुळेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ज्या जिल्ह्यांत कमी लसीकरण झाले आहे त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा असे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.

लसीकरणचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा; मुख्यमंत्र्यांची सूचना
भाजपकडून विकासकामांच्या फलकबाजीचे उघडपणे समर्थन

लसीकरणामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको असे स्पष्ट केले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com