mumbai pune expressway, mumbai pune expressway accident news saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Accident News : बाेर घाटात मालवाहतुकीच्या वाहनांचा अपघात, विद्यार्थ्यासह तिघे जखमी

या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

Siddharth Latkar

- दिलीप कांबळे / सचिन कदम

Mumbai Pune Expressway Traffic Update : पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास खंडाळा बोर घाटातील (borghat khandala) अंडा पॉईंट अवघड वळणावर कंटेनर आणि पीकअँप या दाेन वाहनांची टक्कर झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

या अपघातात कंटेनर खाली वाहन सापडले. त्यामुळे वाहनाचे माेठं नुकसान झाले. तसेच वाहनातील चालक केबिनमध्ये अडकल्याने ताे गंभीर जखमी झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. तसेच एक विद्यार्थी देखील अपघातात किरकोळ जखमी झाला.

घटनास्थळी खोपोलीतील अपघातग्रस्तांसाठीची असलेली मदतीची टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम सुरू त्यांनी केले. या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु आहे.

वाहतुक सुरळीत सुरु

मुंबई पुणे महामार्गावर पहाटे बोरघाटात कंटेनर व पिकअपमध्ये अपघात

० तीन जण जखमी

० खोपोली हद्दीतील बोरघाटात झाला अपघात

० दोन प्रवाश्यांना अपघातानंतर लगेचच बाहेर काढण्यात आले. एका प्रवाशाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश.

० मदत आणि बचाव कार्यासाठी देवदूत, IRB यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमची घटनास्थळी दाखल.

० वाहतुक सुरळीत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंजनगाव खेलोबामध्ये दाखल

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Natural Hair Growth Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'दह्याचा' असा करा वापर; घरच्या घरी मिळवा पार्लरसारखी ट्रिटमेंट

SCROLL FOR NEXT