मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक
मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक SaamTv
मुंबई/पुणे

मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नेते अशी ओळख असलेल्या मंगलदास बांदल यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन शाखांच्या व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. Three Bank managers arrested for illegally approving loan to Mangaldas Bandal

हे देखील पहा -

मंगलदास बांदल यांना या प्रकरणी यापुर्वीच शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. वडगाव शेरी शाखेचे गोरख दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप निम्हण आणि कोथरुड शाखेचे नितीन बाठे या तीनही व्यवस्थापकांनी बांदल यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचे पोलीस तपासात दिसून आल्याने त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसरीकडे शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना हि रिझर्व्ह बँकेने ४०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात रद्द केला आहे. मंगलदास बांदल यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून बँक गैरव्यवहार फसवणूक प्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून या पुर्वी हि बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात इतर काही गुन्हे दाखल झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

SCROLL FOR NEXT