Malvani Police Station सुरज सावंत
मुंबई/पुणे

अ‍ॅपच्या मदतीने समलैंगिक संबधासाठी दबाव, अश्लील व्हिडीओ काढून खंडणीची मागणी, तिघांना अटक

संबधासाठी नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराचा अश्लील व्हिडिओ काढून त्याच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

सुरज सावंत

मुंबई - ग्रांडर अ‍ॅपच्या (App) माध्यमातून तरुणांशी ओळख वाढवत त्यांना भेटायला बोलवून त्यांच्यावर समलैगिक (Homosexuality) संबधासाठी दबाव टाकल्याची घटना मालवणी परिसरात समोर आली आहे. संबधासाठी नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराचा अश्लील व्हिडिओ काढून त्याच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी (Police) तिघांना अटक केली आहे. (Mumbai Crime Latest News)

हे देखील पहा -

23 वर्षीय तक्रारदार हा बोरिवली परिसरात रहात असून तो शिकत आहे. काही दिवसांपूर्वी ग्रांडर या अ‍ॅपपवर त्याची ओळख इरफान खान या आरोपींशी झाली. १७ जानेवारी रोजी आरोपींनी तक्रारदारास मालवणीतील मोहम्मद रफी मैदानाजवळ बोलवले. तिथून एका आरोपीने त्याला स्वत:च्या घरी नेले. त्या ठिकाणी इरफानने इतर आरोपी अहमद शेख व इम्रान शेख यांना बोलावले. त्यानंतर तिघांनी आरोपीवर लैगिक संबधासाठी दबाव टाकला.

मात्र तक्रारदारांनी त्यास नकार दिला. या रागातून तिघांन त्याच्याजवळील मोबाईल, 12,500 रुपये रोख आणि डेबिट कार्ड काढून घेत त्याची लूट केली. तसेच त्याचा अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन असे न करण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितल्याची तक्रार मालवणी पोलिसात तक्रारदाराने दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील सोहेल नावाचा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

Morning Exercise for Weight Loss: वजन कमी करायचंय? सकाळीच करा हे ७ एक्सरसाईज, महिन्याभरात व्हाल फिट

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण;टोपल्या-चाळण्या घेऊन कुटुंब नदीत, VIDEO

SCROLL FOR NEXT