Threat Letter By Naxals सूरज सावंत
मुंबई/पुणे

Naxal News: आम्ही लवकरच बदला घेऊ; मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

Threat Letter By Naxals: नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहूल गेठे यांना टारगेट करत जीवे मारण्याची धमकी पत्र त्यांच्या घरी पाठवलंय. डॅाक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या धमकी पत्रात काय लिहिलेय ते पाहूयात…

सूरज सावंत

Threat Letter By Naxals: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॅाक्टर राहूल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD असलेले डॅाक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

डॅाक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॅाक्टर राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पुर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॅाक्टर राहुल गेठे यांच्यावर होती.

त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहूल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार डॅाक्टर राहूल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहूल गेठे यांना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र त्यांच्या घरी पाठवलंय.

Threat Letter By Naxals

डॅाक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या धमकी पत्रात काय लिहिलंय ते पाहूयात...

जय लाल सलाम

जय किसान

डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयोंका बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

भामरागड / एटापल्ली

CPI - कमिटी

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT