राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा विचार
राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा विचार Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा विचार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन Corona first lockdown पासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात शाळा महाविद्यालये सुरु Maharashtra College करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. दिवाळीनंतर परिस्थिती पाहून राज्य सरकार महाविद्यालय सुरु करण्याबद्दल निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली आहे.

हे देखील पहा-

ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाची चर्चा होत आहे. सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. हे वर्ग सुरू असताना मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी लवकरच शिक्षण विभाग बालरुग्ण टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या दुपारी 3 वाजता वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये एक डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास खुला करून देण्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास करता येतो. मात्र आता राज्य सरकार एक डोस झालेल्याना लोकल प्रवासाला मुभा देण्याचा टास्क फोर्सच्या बैठकीत विचार आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका टळला...

पहिल्या लाटेनंतर सर्वाधिक फटका राज्याला दुसऱ्या लाटेत बसला होता. राज्याची अर्थ व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. उद्योग धंदे, व्यापार ठप्प झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईत सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आले. मात्र आता राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT