एक डोस घेतलेल्यांनाही करता येणार लोकल प्रवास? (व्हिडिओ)

आता लोकल बाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत काल एकही मृत्यू नसल्याने आता एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे
आता एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे
आता एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे- Saam Tv

मुंबई : गणपती, नवरात्री आणि दसरा होऊनही राज्यातील Maharashtra कोरोना आटोक्यात असल्याचे सुखदायक चित्र सध्या आहे. याचमुळे आता लोकल Mumbai Local बाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत काल एकही मृत्यू नसल्याने आता एक डोस Vaccine घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे. Mumbai Local May be open to those who have taken single corona jab

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 3 वाजता वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये एक डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास खुला करून देण्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास करता येतो. मात्र आता राज्य सरकार एक डोस झालेल्याना लोकल प्रवासाला मुभा देण्याचा विचार करत आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका टळला...

पहिल्या लाटेनंतर सर्वाधिक फटका राज्याला दुसऱ्या लाटेत बसला होता. राज्याची अर्थ व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. उद्योग धंदे, व्यापार ठप्प झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईत सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आले. मात्र आता राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. Mumbai Local May be open to those who have taken single corona jab

आता एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 6 वाहने एकमेकांवर धडकुन अपघात ...(पहा व्हिडीओ)

बैठकीला कोण कोण असणार

सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती रहणार आहेत.

मुंबईत असे आहे लसीकरण

मुंबईत आजपर्यंत ९७ टक्के नागरिकांनी लसींचा पहिला डोस तर ५५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झाल्याचे पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com