Maharashtra Assembly Session 2022: "ही लाजीरवाणी गोष्ट असून महाराष्ट्राचा अपमान"- आदित्य ठाकरे
Maharashtra Assembly Session 2022: "ही लाजीरवाणी गोष्ट असून महाराष्ट्राचा अपमान"- आदित्य ठाकरे  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Session 2022: "ही लाजीरवाणी गोष्ट असून महाराष्ट्राचा अपमान" आदित्य ठाकरे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणावर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळी प्रचंड गदारोळ झालेला बघायला मिळाला आहे. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिले आहेत.

हे देखील पहा-

ही खरोखर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, महारष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांचा एक तर राजपाल असे निघून जाणे, आणि त्याच्या भाषणाच्या वेळी त्यांचा अपमान होणं या दोन्ही गोष्टी खूपच अयोग्य आहेत. आम्हाला धक्का देखील बसतो की हे असं होऊ कसं शकत, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी सांगितले आहे. विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत.

सभागृहात घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधामध्ये सत्ताधारी पक्ष विधीमंडळामध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT