Dengue Patient Saam Tv
मुंबई/पुणे

Dengue Patient: यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे २१ हजार रुग्ण; राज्याची राजधानी मुंबई आहे अव्वलस्थानी

Dengue: राज्यात नोंदवण्यात आलेल्या मलेरियाच्या एकूण रुग्णांची संख्या २०१९ मध्ये, ८ हजार ८६६ होती. तर २०२० मध्ये १५ हजार २१५ होती.

Bharat Jadhav

Public Health Department Dengue Data:

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सून हळूहळू माघार घेत आहे. याचदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं साथीच्या आजारांची एक आकडेवारीवरून जाहीर केलीय. या आकडेवारीनुसार, यंदा पावसाळ्यात महाराष्ट्रात डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्या २१ हजार हून नोंदले गेले. तर ८रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Latest News)

दरम्यान नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये राज्याची राजधानी मुंबई अव्वल स्थानावर आहे. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार वाढतात. कारण पावसाळ्यात आर्द्रता आणि साचलेल्या पाण्यात रोग वाहक डासांसाठी प्रजनन वाढत असते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २७ सप्टेंबरपर्यंत यावर्षी राज्यात डेंग्यूचे एकूण १० हजार ५५३ रुग्णांची नोंद झालीय.

यापैकी ३ हजार ५५६ प्रकरणे एकट्या मुंबईत आहेत. त्यानंतर ठाण्यात ७०४ आणि नाशिकमध्ये ६०६ प्रकरणांची नोंद करण्यात आलीय. २०१९ मध्ये राज्यात नोंदवण्यात आलेल्या मलेरियाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ८६६ होती. ती संख्या २०२० मध्ये १५ हजार २१५ इतकी झाली होती. तर २०२१ मध्ये ती ही संख्या १७ हजार ३४१ पर्यंत वाढली. त्यानंतर २०२२ मध्ये त्यात घट झाली होती या वर्षी १४ हजार ६७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर यावर्षी रुग्णांची संख्या १ हजार झाली आहे. याविषयीचे वृत्त इंडियन एक्सप्रेसनं छापले आहे.

सायन हॉस्पिटलचे डीन डॉ मोहन जोशी यांच्या मते, डेंग्यू टाळता येण्याजोगा आहे. परंतु दर वर्षी हा आजार येत असतो. दरम्यान बहुतेक रूग्णांमध्ये डेंग्यूचे सौम्य ते मध्यम प्रमाण असते. तर अंदाजे १० टक्के रुग्णांना ओटीपोटात द्रव साठणं, गंभीर थ्रोम्बोसाइटोपेनिया, रक्तस्त्राव आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु हा आजार बरा होत असतो, असं डॉ. जोशी माध्यमांशी बोलतना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT