Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : ऐन दिवाळीत चोरट्याने साधला डाव, 12 लाखांचे दागिने केले चोरी; पोलिसांनी 100 CCTV तपासून ठोकल्या बेड्या

Pune News : पुण्यात चोरांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. येथे एका घरात एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना चोट्याने डाव साधत तब्बल 12 लाखांच्या मुद्देमाल लंपास केला आहे.

Satish Kengar

>> अक्षय बडवे

Pune Crime News :

पुण्यात चोरांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. येथे एका घरात एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना चोट्याने डाव साधत तब्बल 12 लाखांच्या मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी 100 सीसीटीव्ही तपासून या चोराला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील पटवर्धन बाग एरंडवणे येथे साईश्रद्धा बगल्यातुन पहाटेच्या वेळेस लक्ष्मीपुजनाकरीता दागिने आणि पैसे ठेवण्यात आले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंदिरात ठेवण्यात आलेले सोन्याचे दागीने तसेच ४ लाख रुपये रोख रक्कम असा जवळपास ९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी अनिल नाईक यांनी त्याबाबत अलंकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.  (Latest Marathi News)

घटनेची दखल घेत पोलिसांनी जवळपास १०० सीसटिव्ही तपासले. एरंडवणे भागातून सीसीटिव्ही फुटेज तपासात पोलीस नांदेड गावापर्यंत पोहेचले. दरम्यान, तपास पोलिसांना या प्रकरणातील आरोपी हा नांदेडगाव जगताप नगर येथे रहात असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे तात्काळ तपास पथकाने संतोष किसन शिलोत यास ताब्यात घेऊन फिर्यादी यांच्या घरातून चोरी केलेले सोन्याचे दागीने व ३.५० लाख रुपये रोख रक्कम, गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटारसायकल मोबाईल असा तब्बल १२ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस सध्या या आरोपीने आणखी कुठे चोरी केली आहे, याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT