Eknath Shinde News: अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; CM एकनाथ शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

Eknath Shinde News: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं आहे. या पावसाने शेतकऱ्यांना चांगलंच रडवलं आहे. मात्र, याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Eknath shinde News
Eknath shinde News Saam Digital
Published On

Eknath shinde News:

राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं आहे. या पावसाने शेतकऱ्यांना चांगलंच रडवलं आहे. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना (Farmers) अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके मातीमोल झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या पावसानं शेतकऱ्यांना चांगलंच रडवलंय. याचदरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath shinde News
Maharashtra Rain: राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा, शेतकऱ्यांची धावपळ

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: मुख्यमंत्री शिंदे

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याचबरोबर राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळीग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अवकाळी पावसाचा राज्यातील विविध जिल्ह्यांना तडाखा

काल कोसळलेल्या अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा यासहित इतर जिल्हांनाही तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. तसेच शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.

बुलडाण्यात गारांचा पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतमालाचं प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी केंद्रीय माहिती संवाद आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे.

Eknath shinde News
Supriya Sule on Farmers : दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत, सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी

अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस, तूर, गहू, हरभरा आणि फळबागांचं मोठ नुकसान झालं आहे. सिंदखेडराजा देऊळगाव राजा आणि लोणार या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी उभारलेले शेडनेट पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. तर अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतजमीन ही खरडून गेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com