There are two streams of opinion in the government regarding the arrest of Raj Thackeray
There are two streams of opinion in the government regarding the arrest of Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंना अटक करायची की नाही? सरकारमध्ये दोन मतप्रवाह...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अटक करायची की नाही यावरून सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत. राज ठाकरे यांना अटक (Arrest) केल्यास त्याचा राजकीय फायदा राज ठाकरेंना होऊ शकतो असा एक मतप्रवाह (Stream of opinion) सरकारमधील काहींचा आहे. तर राज ठाकरे यांच्या भाषणामुळे दोन समाजात तणाव वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी असा दुसरा मतप्रवाह आहे. (There are two streams of opinion in the government regarding the arrest of Raj Thackeray)

हे देखील पाहा -

राज ठाकरेंच्या अटकेबाबत निर्णय घेण्यासाठी पोलीस खात्यांच्या (Maharashtra Police) बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच गृहखाते परिस्थितीचा आढावा घेत आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आल्यास राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरे यांना अटक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबाबतही चाचपणी सुरू आहे.

मनसेचे नॉट रीचेबल

दरम्यान राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नॉट रीचेबल झाले आहेत. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे सगळे प्रमुख नेते नॉट रीचेबल असून त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ (बंद) येत आहेत. सोबतच पोलिसांनी मनसेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याला चांदीवलीतून अटक केली आहे.

महेंद्र भानुशाली यांना अटक

राज ठाकरेंच्या हनुमान चालीसेच्या आवाहनानंतर पोलिसांकडून ही पहिली कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केल्यानंतर ज्या मनसैनिकाने पहिल्यांदा हनुमान चालीसा लावण्यात आली त्या मनसैनिकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेचे चांदीवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सभा घेण्यापूर्वी पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन या सभेत झाल्याचे सूत्रांकडून समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यानंतरच राज यांच्या सभेला परवानगी दिली होती.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT