उल्हासनगरात शौचालयाला दरवाजेच नाहीत! चक्क छत्र्यांचा घ्यावा लागतोय अडोसा!
उल्हासनगरात शौचालयाला दरवाजेच नाहीत! चक्क छत्र्यांचा घ्यावा लागतोय अडोसा! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात शौचालयाला दरवाजेच नाहीत! चक्क छत्र्यांचा घ्यावा लागतोय अडोसा!

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नसल्यानं नागरिकांवर चक्क छत्रीचा अडोसा घेऊन शौचाला बसण्याची वेळ आलीये. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उल्हासनगर शहरातील कॅम्प २ परिसरात हनुमान नगर हा झोपडपट्टी परिसर आहे. या परिसरात महापालिकेनं काही वर्षांपूर्वीच लेखी रुपये खर्चून महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारलं. मात्र, या शौचालयाचे दरवाजे काही दिवसातच तुटले, तर काही चोरीला गेले.

हे देखील पहा :

त्यामुळं इथल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांपासून ते महापालिकेपर्यंत सगळीकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळं इथल्या नागरिकांना आता दरवाजां अभावी चक्क छत्रीचा अडोसा करुन शौचाला बसण्याची वेळ आली आहे. दररोज सकाळी इथले नागरिक एका हातात पाण्याचा डबा, तर दुसऱ्या हातात छत्री असते. धक्कादायक बाब म्हणजे महिलांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे.

उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना याबाबत विचारलं असता, तुम्ही सांगताय तसं जर असेल, तर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित शौचालयाची दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, ८०० कोटींच्या घरात बजेट असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना छत्र्या घेऊन शौचालयात बसावं लागत असेल, तर ही परिस्थिती नक्कीच गंभीर म्हणावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Airport News Today: गोवा विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी आल्यानं खळबळ

Benifits of Buttermilk: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

Today's Marathi News Live : मालवणी दारुकांड प्रकरणी ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता

Broccoli Benefits: ब्रोकोली खाताय? फायदे जाणून घ्या

Pankaja Munde News Today: मराठा आंदोलक तरुणांची पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी!

SCROLL FOR NEXT