World's largest elevator installed in Mumbai at JWC Facebook/ @koneindiaofficialpage
मुंबई/पुणे

जगातली सर्वात मोठी 'लिफ्ट' मुंबईत! एका खेपेत २०० लोकांना वाहून नेण्याची क्षमता

World's largest elevator in Mumbai : मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) मध्ये जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: जगातील सर्वात मोठी उद्वाहक (Elevator) किंवा लिफ्ट (Lift) कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? उत्तर माहित नसेल तर आम्ही सांगतो. जगातली सर्वात मोठी लिफ्ट ही आतापर्यंततरी आपल्याच देशात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात जगातली सर्वात मोठी लिफ्ट आहे. कोन एलेविटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (KONE India PVT. LTD) या कंपनीने जगातील सर्वात मोठी लिफ्ट भारतात तयार केली आहे. ५ मे २०२२ ला (गुरुवारी) या लिफ्टचे लोकार्पण करण्यात आले. (World's largest elevator installed in Mumbai at JWC)

हे देखील पाहा -

भल्या मोठ्या टोलेजंग इमारतींमध्ये लिफ्ट असतात. मात्र जगातली सर्वात मोठी लिफ्ट ही मुंबईत आहे. या लिफ्टमध्ये एकावेळी १५-२० नव्हे तर तब्बल २०० लोकं उभे राहू शकतात. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) मध्ये जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) ही लिफ्ट कार्यान्वित करण्यात आलं आहे. २५.७८ चौरस मीटरच्या क्षेत्रफळात पसरलेली ही लिफ्ट एकावेळी 200 लोकांना वाहून नेण्यास सक्षम आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटरमधील या लिफ्टला पाच थांबे असतील. तर, या लिफ्टचं वजन १६ टन आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी लिप्ट बनली आहे.

कोन इलेवेटर्सचे (KONE Elevator India Private Limited) व्यवस्थापकीय संचालक अमित गोसईन यांनी जगातील सर्वात मोठी लिफ्ट भारतात असून त्यांची निर्मिती कोन इंडिया कंपनीनं केल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहेत. भारतातील अनेक प्रकल्पात आम्ही जागतिक पातळीची रचना आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लिफ्टच्या निर्मितीसाठी भारतातील तज्ञांसह परदेशातील तंत्रज्ञांचं सहकार्य घेतल्याचं कोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं आहे. ११ मे १९९८ पासून भारताच्या तांत्रिक प्रगतीच्या यशासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी (१९९८) ला भारताने पोखरण अणुचाचणी केली होती. याच दिवसाचं औचित्य साधत मुंबईत जगातली सर्वात मोठी लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. कोन एलिव्हेटर्स इंडियाने बीकेसी येथे १८८ जागतिक दर्जाच्या लिफ्ट आणि एस्केलेटर याआधीच कार्यान्वित केल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT