बायकोसाठी चोरी करणारा चोरटा गजाआड ! 45 दुचाकी सह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

बायकोसाठी चोरी करणारा चोरटा गजाआड ! 45 दुचाकी सह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

सराईत दुचाकी चोरट्यासह सहा चोरांना गजाआड...

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली : बायकोसह हौस मौज करण्यासाठी आणि पैसे कमी पडतात म्हणून एक चोरटा महागड्या दुचाक्या चोरी करायचा आणि त्या विकायचा. या सराईत चोरट्याला मानपाडा पोलीसानी अटक केली आहे. दीपक सलगरे या चोरट्याचे नाव असून हा चोर आपल्या  साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करत असे.

कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरट्याच्या मागावर पोलिस होते. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने या परिसरात दुचाकी चोरी झालेले आहेत त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले.

तसेच भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवले. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक विरोधात मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत. बदलापूर पाईपलाईन रोडवरील पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे हा आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती.

दीपक मोटरसायकल चोरी करायचा व ती मोटर सायकल त्याचा साथीदार राहुल डावरे यांच्या मदतीने नागरिकांना स्वस्त गाड्यांच्या आमिष दाखवून विकायचा. या गाड्या फायनान्स कंपनी मधून आणल्या आहेत असे आमिष तो ग्राहकांना देत या चोरीच्या गाड्या त्यांच्या माथी मारत होता. तसंच काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू यांनादेखील विकल्या, बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान ,समशेर खान,भैरवसिंग खरवड यांच्या मार्फत इतराना विकत होता.पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरे सहा सहा जणांना ताब्यात घेतलं या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी 17 दुचाक्या 23 दुचाक्यांचे इंजिन इतर पार्ट्स व एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार यांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत. याबाबत कल्याण डीसीपी संजय गुंजाळ यांनी सांगितले की नागरिकांनी स्वस्त दुचाकीचा आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाक्या विकत घेऊ नये असं आवाहन नागरिकांना केलं आहे. अन्यथा इथून पुढे अशा दुचाक्या विकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातील सर्वात जुन्या Currency बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Sudesh Bhosale : गायक सुदेश भोसले यांच्या लेकीने प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा PHOTOS

तरुणाचा मित्रावरच जीव जडला, आधी शरीरसंबंध ठेवले नंतर घरातच संपवलं, शरीराचे तुकडे करून....

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Neck Pain : सावधान! तुमची उशी मानदुखीचे कारण तर नाही ना? तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT