...आणि 'डॉन' थरथर कापला! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

...आणि 'डॉन' थरथर कापला!

'मै हूं डॉन', 'डॉन को पकडना मुमकीन नही' हेच चॅलेंज त्याने पोलिसांनाही दिले.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली विष्णूनगर पोलीसांनी एका सराईत मोबाईल चोरास अटक केली आहे. या भुरट्या चोरावर आधीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चाळीतील घरांना लक्ष करून तो घरातील मोबाईल चोरून पसार व्हायचा. चोरलेला फोन बंद न करता त्यावर कोणी कॉल किव्हा व्हिडिओ कॉल केला तर 'मै हूं डॉन' असे बोलून तो चॅलेंज देत नागरिकांना घाबरवत होता. आता या 'डॉन'च्या मुसक्या आवळत विष्णुनगर पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली आहे आणि अटक होताच डॉन थरथर कापू लागला. (The thief was saying that "I am Don" but he got scared when he was arrested by the police)

हे देखील पहा -

डोंबिवली पश्चिममधील कोपर भागातील एका चाळीमध्ये काही नागरिकांचे फोन चोरीला गेले होते. त्यांनी याबाबतची माहिती विष्णूनगर पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी त्वरित माहिती घेत गुन्हा दाखल केला आणि सदर चोरचा तपास चालू केला. विष्णूनगरचे प्रभारी वपोनी राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, बी.के. सांगळे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने व गुप्त बातमीच्या मार्फत शोध चालू केला.

दरम्यान पोलीस सांगळे यांचे सतीश सोबत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलणे देखील झाले, तेव्हाही त्याने 'मै हूं डॉन', 'डॉन को पकडना मुमकीन नही' हेच चॅलेंज पोलिसांनाही दिले. तेव्हा त्याच्या कॉल वरून तांत्रिक बाबीद्वारे शोध घेतला असता तो वाशीम येथे असल्याचे दाखवत होते. मात्र भांडुप येथे पुन्हा तो चोरीच्या उद्देशाने येताच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली.

अटक होताच डॉन थरथर कापू लागला. त्याच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपीस कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT