Sanjay Raut vs BJP LIVE Updates: 2 वर्षापूर्वी "या" मंत्राच्या घरच्या लग्नात जंगलाची थीम; साडे नऊ कोटीचा खर्च...हे ED का दिसलं नाही? Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नातील कार्पेट 'साडे नऊ कोटींचे'; राऊतांचा गंभीर आरोप

भाजपच्या साडे- तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे- तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. राऊत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन- आशिष शेलार- चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

२ वर्षांपूर्वी राज्यामध्ये भाजपचे सरकार होते. त्यावेळेस वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला होता. त्या लग्नात कार्पेट हे साडे कोटी रुपयांचे होते. हे ईडीला आजिबात दिसले नाही, पण मी कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास केला. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, २ वर्षांपूर्वी भाजपच्या सरकारातील वनमंत्र्यांच्या घरी लग्न होते. ते वनमंत्री होते म्हणून लग्नाची थीम ही जंगलाची होती. त्यावेळेस तिथलं कार्पेट हे साडे नऊ कोटींचे होते. या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला होता. हे ईडीला कधी दिसले नाही. पण आम्ही सांगितले लग्न आहे...कशाला उगाचा काढा. पण मी ज्या ठिकाणी कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास सुरु केला होता.

खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याबद्दल बोलत असताना सांगितले आहे की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असे घाणेरडे राजकारण नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?

शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता असं खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT