शाळेची फी थकवल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला तीन तास एकटेच बसवले! SaamTVNews
मुंबई/पुणे

शाळेची फी थकवल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला तीन तास एकटेच बसवले!

डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश हायस्कुल मधील घटना; मुलास चक्कर आल्याने घटना उघडकीस

प्रदीप भणगे

डोंबिवली : फी थकीत असल्याने डोंबिवलीतील एका शाळेने दहावीच्या एका विद्यार्थ्याला पालकांना बोलव तोपर्यंत एकट्याला एका वर्गात बसवलं होतं. तब्बल तीन तास एकट्यात बसलेल्या या मुलाला (Student) अचानक चक्कर आली व ही घटना उघडकीस आली. त्याला भोवळ आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मुलाच्या पालकांनी शाळेने आमच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावत मानसिक त्रास दिला, आज तर मुलाला वेठीस धरलं त्यामुळे त्याची तब्येत बिघडल्याचा आरोप केला.

हे देखील पहा :

तर, ग्रीन इंग्लिश हायस्कुल (Green English Highschool) प्रशासनाने मात्र या आरोपांचे खंडन केलं आहे. आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांकडे फी संदर्भात विचारणा केली नाही. पालकांना फीसंदर्भात सांगितलं होतं. या मुलाला त्याचे पालक येईपर्यंत वेगळं बसवलं होतं असे शाळेचे म्हणणे आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फी (Fee) साठी भर वर्गातून विद्यार्थ्याला बोलावून पालक येईपर्यंत दुसऱ्या वर्गात बसवणं कितीपत योग्य आहे? शिक्षण विभागाकडून शाळेवर काय कारवाई होणार हे देखील पाहावे लागणार आहे.

डोंबिवली (Dombivli) आजदे गावयेथे राहणाऱ्या मनोज धूरी यांचा 16 वर्षीय मुलगा चंदन धुरी हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर त्याचे शाळेत दहावीच्या वर्गाचे क्लास सुरू आहेत. नेहमीप्रमाणे आज चंदन शाळेत गेला होता वर्गात सर्व मुले बसली होती. दरम्यान, पहिला तास झाला याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी चंदन याला तू तुझ्या पालकांना बोलव असे सांगत त्याला एकट्याला एका रुममध्ये बसायला सांगितले.  जवळपास तीन तास चंदन हा वर्गात एकटाच बसला होता.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे वडील फी कसे भरणार या विचाराने चंदन सुन्न  झाला त्यातच चंदनची तब्येत बिघडली, त्याला भोवळ आली व तो खाली पडला. शाळेने (School) प्राथमिक उचपार करीत त्याच्या पालकांना बोलावून घेतले. चंदनचे वडील मनोज यांनी लॉकडॉऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. नोकरी गेल्याने आम्ही फी भरु शकत नाही असे शाळेस सांगितले. मात्र, पैसे हाती येताच फी भरु असे शाळेला सांगितले होते. मात्र शाळेने फी भरण्याचा तगादा लावत आज  मुलाला वेठीस धरलं. यापूर्वीही त्याला शाळेने वर्गाच्या बाहेर उभे केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळा प्रशासनाने पालकांच्या आरोपांचे खंडन करत दोन वर्षापासून फी थकीत आहे. फी भरण्याचा तगादा विद्यार्थ्याकडे लावला नाही. त्यांच्या पालकाना फी भरण्यास सांगितले. त्याच्या पालकांना बोलावून घेतले होते.  तोपर्यंत एका वर्गात त्याला बसवून ठेवले. कोणत्याही विद्यार्थ्यांला आम्ही मानसिक त्रस दिला नसल्याचे शाळेने स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT