The strength of the NCP increased in kalyan प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC: राष्ट्रवादीची ताकद वाढली; भाजपच्या माजी नगरसेवकांंसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

KDMC Elections Latest News: अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी झाल्याने कल्याण ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी ताकद वाढली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (केडीमसीची) निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर कल्याण आणि कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवकांना आज राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश देण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. (The strength of the NCP increased; Admission former BJP corporators and workers in kalyan)

हे देखील पाहा -

कल्याण - डोंबिवलीमधील (Kalyan - Dombivali) माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, माजी भाजपा (BJP) नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएम माजी नगरसेविका तांजिला मौलवी, उर्मिला गोसावी आणि ठाणे जिल्हा एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष फैजल जलाल यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला. हा प्रवेश मंत्री ‌जितेंद्र आव्हाड यांच्या ‌उपस्थितीत झाला. यावेळी माजी खा. आनंद परांजपे, डॉ. वंडारशेठ‌ पाटील, दत्तात्रय वझे उपस्थित होते.

अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (Kunal Patil) यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी झाल्याने कल्याण ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी ताकद वाढली आहे. तर एमआयएमच्या पदाधिकारी यांचा प्रवेश केल्याने कल्याण पश्चिम मध्ये राष्ट्रवादी ताकत वाढण्यासाठी मदत होणार आहे. एकीकडे शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीने सुद्धा हम किसेसे कम नही असा संदेश दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT