राज्यात ओमिक्रॉनचे 68 तर कोरोनाचे 12,160 रुग्ण; अनेक ठिकाणी शाळा बंद Saam TV
मुंबई/पुणे

राज्यात ओमिक्रॉनचे 68 तर कोरोनाचे 12,160 रुग्ण; अनेक ठिकाणी शाळा बंद

राज्यात कोरोनाने (Corona) देखील आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज्यात कोरोना पाठोपाठ ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचे नवे 68 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या 578 वर गेली आहे. 578 पैकी 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मुंबईत 40, पुणे शहरात 14 नवे रुग्ण रुग्ण आढळले आहेत. नागपुरातही 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात डेल्टा व्हेरियंटनंतर तिसरी लाट ही ओमिक्रॉनची असेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे, त्यामुळे सराकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोरोनाने (Corona) देखील आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज राज्यात 12,160 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तसेच 1,748 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. आज कोरोनामुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या 52,422 अॅक्टीव रुग्ण आहेत. त्यामुळे आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. देशाबरोबरच राज्य सरकारने ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आपले प्रयत्न सुरु केले आहेत. नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई याठिकाणच्या शाळा प्रशासनाने बंद केल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख हा वाढता दिसत आहेत, त्यामुळे अधिकची खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून राज्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या माणगावमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT