"कोरेगाव-भीमा लढाईचे 'ते' पुस्तक माळवदकरांनी नव्हे; RSS शी संबंधित व्यक्तीने लिहलंय' Saam TV
मुंबई/पुणे

"कोरेगाव-भीमा लढाईचे 'ते' पुस्तक माळवदकरांनी नव्हे; RSS शी संबंधित व्यक्तीने लिहलंय'

कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव हे पुस्तक रोहन माळवदकर (Rohan Malwadkar) यांनी लिहिलेलं नसून ते सौरभ विरकर या RSS शी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने लिहलं असल्याचा दावा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव हे पुस्तक रोहन माळवदकर (Rohan Malwadkar) यांनी लिहिलेलं नसून ते सौरभ विरकर या RSS शी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने लिहलं असल्याचा दावा  रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने (Republican Vidyarthi Sena) केला आहे. '१ जानेवारी १८१८ कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव' हे पुस्तक प्रकाशित झाल्याने दलित समाजकडून त्याचा निषेध केला जातोय अशातच आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी हे पुस्तक माळवदकर यांनी  लिहिलं नाही असा दावा केला आहे.

शिवाय हे पुस्तक उजव्या विचारसणीच्या व्यक्तीने लिहलं आहे. याचे पुरावे म्हणून https://www.inmarathi.com/110722/bhima-koregaon-war-and-ambedkar/amp/  या पेजवर ४ जानेवारी २०२१ ला जो लेख प्रसिध्द केला त्यात लेखकाचे नाव सौरभ विरकर (Saurabh Virkar) या नावांनी प्रसिध्द केला गेला आहे असही त्यांनी सांगितलं आहे.

पुस्तकातील लिखाण सौरभ विरकर यांचे लिखाण संदर्भ तंतोतंत जुळत असून अँड रोहन माळवदर पुस्तक प्रकाशित वेळी सौरभ विरकर उपस्थित असल्याचे पुरावे बनसोडे यांनी प्रसिध्द केले असल्याचही विद्यार्थी सेनेने म्हटंल आहे.

दरम्यान माळवदकराचे पुस्तक सौरभ विरकर हाच वितरीत करीत असून त्याच्या सोशल मिडीया (Social Media) पेजवर आदरणीय प्रबोधनकारक ठाकरे यांच्या पुस्तकावर आणि आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारवर आक्षेपार्ह लिखाणही दिसून येतं आहे. तसंच दोन समाजात तेढ कसा निर्माण होईल या उद्देशाने हे पुस्तक लिहल्याचा आरोप विवेक बनसोडे यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) दाखल!

Alia Bhatt Net worth: आलिया भट्टची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Pune News: पुण्यात फेरीवाल्यांची मुजोरी, अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला; लोखंडी माप अन् दगडाने मारहाण| VIDEO

Shravan Vrat : महाराष्ट्रात श्रावण कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या कोणते व्रत कोणत्या दिवशी करावे

Beed : दोन वर्षांपासून शिक्षक नाही; शाळेला कुलूप ठोकत गावकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT