चिंतेत भर! देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता?
चिंतेत भर! देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता? Saam Tv
मुंबई/पुणे

चिंतेत भर! देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - देशात तिसऱ्या लाटेची शक्यता निती आयोगाने वर्तवली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची धास्ती व्यापाऱ्यांनी घेतली असून माल भरायचा की नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे पडला आहे. पुण्यातील Pune तुळशीबाग Tulishbagh ही मोठी व्यापारी पेठ आहे. या ठिकाणी तुळशीबाग बाजारपेठ या ठिकाणी पाचशेच्या वरती छोटे-मोठे व्यावसायिक आहेत.

बाजारपेठ पूर्वपदावरती येत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवलाने तुळशीबागेतील व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासमोर नवीन माल भरायचा की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यात लॉकडाऊनच्या धोरण अस्वस्थतेमुळे व्यापारी पुन्हा एकदा धास्तावले आहेत.

हे देखील पहा -

नीती आयोगाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली आहे. आणि अशात निर्बंधामध्ये शिथिलता देत असताना जर बाजारात गर्दी होऊ लागली आणि रुग्ण संख्या वाढली तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

त्यामुळे येणाऱ्या सणासुदीसाठी माल भरायचा की नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. मागील वर्षी ही सर्व सण लॉकडाऊन मध्ये गेली मागील माल अजून विकला गेला नाही आणि आता नवीन माल खरेदी करावा आणि तो विकला नाही लॉकडाऊन लागलं तर आथिर्क अडचणी निर्माण होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: गुटख्याच्या पुडीने नाणेफेकचा सराव करावा! १० वेळा टॉस गमवणाऱ्या ऋतुराजची दिग्गज माजी क्रिकेटर घेतली फिरकी

Sharad Pawar Health News | शरद पवार यांची तब्येत बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द

Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT