मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोनामुळे बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावरुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
लोकशाहीत सर्वात मोठ शस्त्र म्हणजे मत आहे. त्याच्या आधारे तुम्ही रंकाचा राव आणि रावाचा रंक करु शकता. सामान्य जनता सर्वात शक्तीमान जनता आहे. सत्तेच व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे. सर्व काही माझ्या अंमलाखाली असावे हे देखील अंमली पदार्थाचे व्यसन एक व्यसनच आहे. मी आजही देखील सांगतो, हिंमत असेल तर सरकार पाडुन दाखवावे.
हे देखील पहा-
छापा काटा खेळ असतो. तसा 'छापा' टाकुन 'काटा' काढण्याचा प्रकार सुरू आहे. ही थेरं फार काळ चालणार नाहीत,अशी खोचक प्रतिक्रिया ठाकरेंनी केली आहे. हर हर महादेव म्हणजे काय हे परत एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखविण्याची वेळ येऊ नये, परंतु आलीच तर दाखवावे लागणार आहे. शिवसेनेवर टीका करायाला तोंडात बोंडख घालुन बसले आहेत, ते जर 1992 च्या दंगलीत शिवसेना नसती, तर आज दिसले असते का? हिंदुत्व धोक्यात आहे.
ते परक्यांपासुन नाही तर या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे. मी पूर्वी बोललो होतो की माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. एकमेव मर्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव मर्द तेव्हा उभा होता. धमक्या येत होते. परंतु, त्यांनी सांगितले की ज्या रंगाची गोळी आम्हाला चाटुन जाईल तो रंग हिंदुस्थानातुन संपवुन टाकणार आहोत. तेव्हा बोलायची यांची कोणाची हिंमत नव्हती. शेपुट आत घालुन बसले होते.
हिंदुहृदयसम्राट बोलले होते, 'गर्व से कहो हम हिंदू हैं' हा माझा मर्द शिवसैनिकच आहे.अन्य कोणीही तेव्हा समोर आले नव्हते. केवळ हा शिवसैनिक आज तुमची पालखी वहात नाही, म्हणून भ्रष्टाचारी झाला? शिवसैनिकाचा जन्म देव, देश आणि धर्मासाठी झाला आहे. तुमच्या पालखीचा भोई होण्यासाठी नाही. गटारीच पाणी तुमच्याकडे टाकलं की गंगा होते? आमच्याकडे शब्दभंडार हा भरपुर प्रमाणात आहे. माझ्याकडे, आजोबांचे आहे आणि वडिलांच तर आहेच आहे. पण आमचे हे संस्कार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.