Pune Crime सचिन जाधव
मुंबई/पुणे

बोपदेव घाटातील 'त्या' मृतदेहाचं गूढ उलगढलं; मुलानेच केला बापाचा खून

पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपदेव घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील बोपदेव घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. दर व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

धक्कादायक म्हणजे मुलानेच मावस भावाच्या मदतीने आपल्या वडिलांचा खून केल्याचं पोलिस (Police) तपासात निष्पन्न झालं आहे. पवन देबू शर्मा वय वर्ष ४० असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवन शर्मा याचा मुलगा सोनू पवन शर्मा वय २५ आणि मावस भाऊ शैलेंद्र गोवर्धन अहिरवार वय २० असं दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील पाहा -

वडील दारू पिऊन सतत आईला मारहाण करत असल्याच्या रागातून त्याने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. सोनू शर्मा याच्या वडिलांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो मुलगा सोनू आणि पत्नीला नेहमी मारहाण करायचा.

असाच तो १३ जूनच्या रात्री देखील त्याने दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पवन शर्मा याला बाहेर नेले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. शिवाय फोन केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बोपदेव घाटात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT