'त्या' अल्पवयीन मुलीच्या खूनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा- आ. माधुरी मिसाळ Saam Tv News
मुंबई/पुणे

'त्या' अल्पवयीन मुलीच्या खूनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा- आ. माधुरी मिसाळ

हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा तसेच विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

साम टिव्ही

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे, ता. २२ ऑक्‍टोबर: बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. (The murder case of 'that' minor girl should be tried in a fast track court demand by mla Madhuri Misal)

हे देखील पहा -

मिसाळ म्हणाल्या, 'गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन दिले आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत लवकरच राज्य शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला जाईल.' क्षितिजा व्यवहारे या आठवीत शिकणार्या चौदा वर्षे वयाच्या मुलीचा एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरामध्ये धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून १२ ऑक्‍टोबरला संध्याकाळी खून केला होता. ती कबड्डी खेळाडू होती. यश लॉन्स परिसरात ती कबड्डीचा सराव करीत होती. या गंभीर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

अनेक गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. खरं तर अशाप्रकारचे गुन्हे करण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अल्पवयीन मुलांचा गैरवापर करीत असतात. कायद्यातील तरतुदींमुळे ही मुले निर्दोष सुटतात. त्यामुळे कायद्यात बदल करणे आवश्यक वाटते. विधिमंडळात आणि कायदे तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, अशी ही मागणी मिसाळ यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT