31 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेवर MPSC समन्वय समिती बहिष्कार टाकणार Saam Tv
मुंबई/पुणे

31 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेवर MPSC समन्वय समिती बहिष्कार टाकणार

२४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या आरोग्य भरती परिक्षेत झालेल्या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या आरोग्य भरती परिक्षेत झालेल्या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ३१ ऑक्टोबरला गट- ड च्या पदांची परीक्षा नियोजित आहे. या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात याव्यात आणि यापुढील सर्व गट-क आणि गट-ड सरळसेवा भरती परीक्षा MPSC आयोगामार्फत घेण्यात याव्यात यासाठी ३१ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा-

एमपीएस्सी समन्वय समिती तर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिवशी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बहिष्कार टाकून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांकडून #onlyMPSC आणि टोपे राजीनामा द्या हा ट्रेंड करत सोशल मिडीयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांकरिता रविवारी होत असलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आले, तर काही ठिकाणी उशिरा मिळाले अशी उमेदवारांची तक्रार होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. या उमेदवारांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सांगितले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT