दुर्दैवी : 5 महिन्याच्या  बाळाला आईनेच फेकले पाण्याच्या ड्रममध्ये; चिमुकल्याचा मृत्यू !
दुर्दैवी : 5 महिन्याच्या बाळाला आईनेच फेकले पाण्याच्या ड्रममध्ये; चिमुकल्याचा मृत्यू ! कल्पेश गोरडे
मुंबई/पुणे

दुर्दैवी : 5 महिन्याच्या बाळाला आईनेच फेकले पाण्याच्या ड्रममध्ये; चिमुकल्याचा मृत्यू !

कल्पेश गोरडे

ठाणे : ठाण्यातील (Thane) कळवा परिसरात महात्मा फुले नगर या ठिकाणी काल एका पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये पाच महिन्याचे बाळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती या घटनेचा तपास पोलिसांनी केला असता पोलिसांच्या हाती काही पुरावे लागेल आणि त्या अनुषंगाने पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पाच महिन्याच्या बाळाच्या आईलाच अटक केली आहे. आपल्या 5 महिन्याच्या मुलाला घरातून कोणतरी अपहरण केल्याची तक्रार 24 डिसेंबर रोजी शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली

दरम्यान पोलिसांना 25 तारखेला सकाळी आठच्या सुमारास घराच्या शेजारी असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या ड्रममध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी या बालकाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची यंत्र फिरवली आणि 24 तासाच्या आत बाळाच्या आईनेच त्या बाळाला पाण्याच्या ड्रम मध्ये टाकल्याचे निष्पन्न झाले. 25 तारखेला सळी बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर अज्ञात इसमाने अपहरण करत बाळाला ठार मारून पुरावे नष्ट करण्यासाठी घराजवळील पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचा प्राथमिक अंदाज बांधत पोलिसांनी तपासाची सुरुवात केली होती.

हे देखील पहा -

या प्रकरणाची सखोल चौकशी करत असताना बालकाच्या आईच्या संशयास्पद हालचाली आणि हावभाव बघून पोलिसांना संशय बळावला आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान बाळाच्या आईने स्वतः बाळाला खोकल्याचे औषध दिले होते खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस (OverDose) झाल्यामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली आणि बाळ कुठली हालचाल करत नसल्यामुळे घाबरलेल्या बाळाचा अपहरण झाल्याचा बनाव केला आणि मृतदेह कुठे तरी लपवून ठेवला त्यानंतर कोणाला संशय येऊ नये या साठी रात्री अंधाराचा फायदा घेत तिने बाळाचा मृतदेह घराच्या शेजारी असलेल्या पाण्याचा  पिंपात टाकल्याच पोलीस तपासात उघडकीस आल आहे. या बालकाचा मृत्यू औषधाच्या ओवर डोसमुळे झाला की पाण्यात बुडून झाला हे आता शवविच्छेदन अजून निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT