पुणे : आमदार गोपिचंद पडळकरांनी (MLA Gopichand Padalkar) त्यांच्यावरती हल्ला झाल्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटद्वारे प्रसारीत केला आहे. तसंच आपण महाराष्ट्र सरकारने दिलेली सुरक्षा देखील नाकारत असल्याचही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. शिवाय पडळकरांनी जयंत पाटील आणि शरद पवार (Jayant Patil and Sharad Pawar) यांच्यासह महाराष्ट्र पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान पडळकरांच्या याच वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, '26 डिसेंबर रोजी व्हिडीओ समोर आला आहे. असा हल्ला झाला असेल तर त्याचा मी निषेधच करतो, मात्र लोकांचा रोष का होता? हे देखील पाहणं गरजेच आहे. तसंच या व्हिडीओ प्रसारीत करण्याच्या प्रकरणाच्या खोलात राजकीय भांडवल होत असेल तर चुकीचं असल्याचही पवार म्हणाले.
दरम्यान अशी सुरक्षा कुठल्याही आमदाराला (MLA) सुरक्षा मिळतेच त्यांनी घेतली नाही हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे, शिवाय एकत्रित बसून ही परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा भाजपचे मोठे नेते कधी टीका करत नाहीत, त्यामुळे असे छोटे नेते जे असतात ज्यांना संधी अशा टीका करण्यासाठीच दिली जाते असा टोलाही त्यांनी पडळकरांना लगावला. खालच्या पातळीवर टीका केली जाते भाजप त्यांना फक्त वक्तव्य करण्यासाठीच नेमत आहेत, त्यामध्ये पडळकर (Gopichand Padalkar) येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळतेच असही ते म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.