Crime News
Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

इस्त्री केलेल्या साडीचे पैसे जास्त घेतले; लॉन्ड्री चालकास लोखंडी सळईने मारहाण

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. इस्त्री केलेल्या साडीचे पैसे जास्त घेतले म्हणून चार आरोपींनी मिळून एका लॉन्ड्री चालकाच्या दुकानावर दगडफेक करून तसेच त्याला लोखंडी सळई आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. (Pune Crime News)

पवन कन्‍हैया चौधरी अस मारहाण झालेल्या लॉन्ड्री चालकाचे नाव आहे. पवन हा हांडेवाडी रोड वर द लॉन्ड्री बॉईज सर्विसेस नावाचे कपडे इस्त्री करण्याच दुकान चालवतो. पवनच्या दुकानांमध्ये अमित किसन पाचरणे ह्या आरोपीने एक साडी इस्त्री करण्यासाठी टाकली होती.

हे देखील पहा-

मात्र, पवन कन्हैया चौधरी याने आपल्याकडून साडी इस्त्री करण्याचे जास्त पैसे घेतले याचा राग मनात धरून आरोपी अमित किसन पाचरणे यांनी आपले सहकारी अनिकेत किसन पाचरणे सनी प्रकाश पानसरे आणि अमोल अशोक शंकर यांच्या मदतीने द लॉन्ड्री बॉईज दुकानावर दगडफेक करून फिर्यादी पवन कन्हैया चौधरी याला लोखंडी सळई आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे. या प्रकरणात पवन कन्हैया चौधरी यांच्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी अमित किसं पाचरणे आणि त्याच्या इतर तीन सरकारविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT