MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

MEA Issued Advisory: कंबोडिया आणि आग्नेय आशिया प्रदेशात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना सांगण्यात येते की, या देशात अनेक बनावट एजंट कार्यरत आहेत. जे भारतातील एजंटांसह लोकांना फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडे आकर्षित करतात.
Mumbai Airport
Mumbai AirportSaam Digital
Published On

रोजगाराच्या शोधात लाओस आणि कंबोडियाला (cambodia) जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी (Indian) फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने (External Affairs Ministry) एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. हे बनावट एजंट भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितले की 'कंबोडिया आणि आग्नेय आशिया प्रदेशात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना सांगण्यात येते की, या देशात अनेक बनावट एजंट कार्यरत आहेत. जे भारतातील एजंटांसह लोकांना फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडे आकर्षित करतात. विशेषतः हे एजंट सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत. जो कोणी कंबोडियामध्ये नोकरी करतो त्याने ही नोकरी फक्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केलेल्या अधिकृत एजंट्सद्वारेच करावी.'

नोकरीचे आमीष दाखवून भारतीयांची फसवणूक केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयच्या अ‍ॅडव्हायझरीनुसार, लाओसमधील गोल्डन ट्रॅगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील कॉल-सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-चलन फसवणूक करणाऱ्या संशयास्पद संस्थांद्वारे 'डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह' किंवा 'कस्टमर सपोर्ट सर्व्हिस' सारख्या पदांसाठी फसव्या रोजगाराच्या संधींची जाहिरात केली जात आहे. या कंपन्यांचे दुबई, बँकॉक, सिंगापूर आणि भारतासह विविध देशांमध्ये एजंट आहेत. हे एजंड सक्रियपणे

भारतीय नागरिकांना नोकरीचे आमीष दाखवून त्यांची भरती करत आहेत. भरती प्रक्रियेमध्ये डायरेक्ट इंटरव्यू आणि टायपिंग टेस्टचा समावेश असतो आणि कंपन्या उमेदवारांना आकर्षक भरपाई पॅकेजेस, हॉटेलमध्ये राहण्याची सोय, रिटर्न एअर तिकीट आणि व्हिसा प्रक्रियेत मदत देण्याचे आमीष दाखवत आहेत.

Mumbai Airport
Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

'भरतीनंतर या लोकांना कधीकधी क्रिमिनल सिंडिकेटद्वारे बेकायदेशीर कृत्यांमध्ये बंधक बनवले जाते आणि सतत शारीरिक आणि मानसिक छळ करून कठीण परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले जाते.' असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने या देशांसाठी व्हिसा प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले की, 'थायलंड किंवा लाओसमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल नोकरीला परवानगी देत नाही आणि लाओ अधिकारी अशा व्हिसावर लाओसमध्ये येणाऱ्या भारतीय नागरिकांना वर्क परमिट जारी करत नाहीत.'

अशाप्रकारे भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अशा फसव्या किंवा शोषणात्मक नोकरीच्या ऑफरपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. डॉक्युमेंट्सची काळजीपूर्वक पडताळणी करताना आणि कोणत्याही मदतीसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.

Mumbai Airport
Arvind Kejriwal: पुढील २- ४ महिन्यांत योगी आदित्यनाथ यांना CM पदावरून हटवणार; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com