माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी पोलीस शिपायाची आत्महत्या

माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील निवासस्थानी तैनात पोलिस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धक्कादायक! नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
धक्कादायक! नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्याSaam Tv

गडचिरोली: माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील निवासस्थानी तैनात पोलिस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साेमवार (ता. 25) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नीतेश अशोक भैसारे (वय 36) असे मृत शिपायाचे नाव आहे.

धक्कादायक! नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
तेलाच्या किमती पुन्हा वाढणार! इंडोनेशियाची पाम तेल निर्यातीवर बंदी

अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयात नीतेश भैसारे कार्यरत होते. साेमवारी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेश यांची ड्युटी होती. ड्युटीवर येताच त्यांनी आपल्या बंदुकीतून स्वत:वरच गोळी झाडली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. नीतेश भैसारे हे मूळ चंद्रपूर (Chandrapur) येथील रहिवासी असून, आपली पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्यास होते.

हे देखील पाहा-

मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले, पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत. तर, विशेष म्हणजे अहेरी येथे राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी नेमणूक झालेल्या पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 20 फेब्रुवारीला माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. तर अशीच आज घडलेली ही दुसरी घटना आहे. माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायानेही तेच पाऊल उचलले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com