ST Strike : यापुढील ST चे नुकसान सरकारला आणि कामगारांनाही परवडणार नाही - अनिल परब Saam Tv
मुंबई/पुणे

ST Strike : यापुढील ST चे नुकसान सरकारला आणि कामगारांनाही परवडणार नाही - अनिल परब

'STचे उत्पन्न वाढले तर कामगारांना प्रोत्साहन म्हणून इंसेंटिव्ह दिले जाईल. कोणत्याही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नये'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यात गेले अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या ST कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी सहयाद्री अतिथीगृहावरती मंत्री उदय सामंत, (Uday samant) आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) तसेच एस टी कामगार शिष्टमंडळ यांच्यासोबत बैठक घेतली आणि या बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली यामध्ये चर्चेनंतर घेतलेले निर्णय माध्यमांसमोर सांगितले. तसेच विलीनीकरणाबाबतचा निर्णय तुर्तास न्यायालयाच्या अधीन असून न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आपणाला म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांना आणि सरकारलाही हा संप परवडणारा नसेल असही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता, देण्यात येणार असून साधारण 7 हजाराची पगारवाढ वाढ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय आपण करणार असलेली पगारवाढ ही 41% ची असून ती एसटी च्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच STचे उत्पन्न वाढले तर कामगारांना प्रोत्साहन म्हणून इंसेंटिव्ह दिले जाईल असे सांगतच कोणत्याही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नये असे आवाहन देखील परब यांनी यावेळी केले. शिवाय एसटी चे यापुढील अधिक नुकसान सरकारला ही परवडणार नाही; आणि कामगारांना ही परवडणार नाही असं देखील परब आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT