BJPच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा; काँग्रेस नाराज.. पुण्यात 'मविआ' मध्ये धुसपुस SaamTV
मुंबई/पुणे

BJPच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा; काँग्रेस नाराज.. पुण्यात 'मविआ' मध्ये धुसपुस

पुण्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार? याचं उत्तर आता मिळणं, अशक्य झालं आहे. कारण दिवसेंदिवस महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या पडत आहेत.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका (Pune Municipal Corporation) अवघ्या काही दिवसांवर आले असताना महाविकास आघाडीतील धुसफूस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता तर काँग्रेसने थेट राष्ट्रवादीलाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे या वादात आणखी एक ठिणगी पडल्याच चित्र दिसत आहे.

पुण्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार? याचं उत्तर आता मिळणं, अशक्य झालं आहे. कारण दिवसेंदिवस महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या पडत आहेत. PMRDAच्या निवडणुकीचा वाद संपत नाही, तोच स्मार्ट सिग्नल व्यवस्थेला (Smart Signal System) सिग्नल व्यवस्थेसाठी 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीने भाजपला (NCP supports BJP) दिलेला पाठिंबा काँग्रेसला चांगलाच खटकला आहे. म्हणूनच काँग्रेसने (Congress) राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करा, असा सल्ला दिला आहे.

PMRDA नियोजन समिती निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडली होती. परिणामी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी-सेनेचे नगरसेवक निवडून आले. यात आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने काँग्रेसवर केला होता. त्यातच आता स्मार्ट सिग्नल व्यवस्थेसाठी महापालिकेकडून स्मार्ट सिटीला 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. या भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीने साथ दिली आणि यावरूनच वादाची नवीन ठिणगी पडली आहे.

पुण्यात भाजपचं मोठे संख्याबळ आहे. असं असताना भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीत एकजूट असणं आवश्यक आहे, हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाचीही गरज नाही. मात्र तसं होताना दिसत नाही. म्हणूनच महाविकास आघाडीची धुसफूस भाजपच्या पथ्यावर पडणार, ही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT