धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले Saam Tv
मुंबई/पुणे

धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

अंबरनाथच्या चिखलोली धरणात रविवारी बुडाली होती मुलं

अजय दुधाणे

अंबरनाथ - चिखलोली धरणात पोहण्यासाठी आलेली दोन मुलं धरणात बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. या मुलांचे मृतदेह अखेर आज दोन दिवसांनी सकाळी पाण्याच्या वर आले आहे. सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावं होती. हे दोघेही अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला होते. विद्यार्थी असलेले हे दोघे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले.

हे देखील पहा -

याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र सतत दोन दिवस शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नव्हते. अखेर आज मंगळवारी सकाळी या दोघांचेही मृतदेह पाण्यावर येऊन तरंगू लागले. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगर-शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांचे उपोषण

Pratharna Behere: 'आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...' अभिनेत्रीचा मनमोहक साजश्रृंगार

Hair care: चमकदार केसांसाठी घरी बनवलेला हा हेअर ग्लॉस मास्क एकदा नक्की लावा

Foldable iPhone: सॅमसंग, गुगलनंतर आता अ‍ॅपलचा डाव! पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येणार

Natural Eyebrow Remedy: लहान मुलांच्या भुवया गडद दिसण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT