Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: भाजप सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा; राऊतांचा बॉम्बस्फोट

याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे- तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. राऊत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन- आशिष शेलार- चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 2२५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा काय झाला आहे. ईडीला हे का दिसत नाही? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेत आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर देखील आहे. निकॉन इन्फ्रा कोणाची आहे, हे मला विचारायचे आहे. ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे. मौजेमध्ये एक मोठा प्रकल्प त्यांनी उभारला केला जात आहे. वाधवानला ब्लॅकमेल केले आणि जमीनीबरोबर ८०-१०० कोटी घेतले आहेत.

राकेश वाधवानच्या खात्यामधून २० कोटी गेले आहेत. त्यांनी म्हणे पीएमसी बॅंक घोटाळा काढला म्हणे, पत्रा चाळ घोटाळा काढला होता. मला त्रास देण्याकरिता माझ्या मित्रांना त्रास देत आहेत. पीएमसी घोटाळ्यातील पैसे वापरत आहेत. राकेश वाधवान आरोपी आहे, आणि आम्ही पैसे वाटतोय असे म्हणत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. पीएमसी बॅंकेचा तपास ईडी करत आहे. यामुळे ईडीकडे मी हे कागदपत्र पाठवले. मात्र हा सोमय्या तिथे दही, खिचडी खात असतो. हे सर्व ईडीचे एजंट झाले आहेत, असे देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT