Sanjay Raut: संजय राऊतांची पत्रकार परिषद फुसका बॉम्ब; दरेकरांचा आरोप

राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्ष आरोप केला आहे. किरीट सोमय्यांवर त्यांनी गंभीर टीका केली आहे.
Sanjay Raut- Pravin Darekar
Sanjay Raut- Pravin DarekarSaam TV
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती.

राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्ष आरोप केला आहे. किरीट सोमय्यांवर त्यांनी गंभीर टीका केली आहे. PMC बँक घोटाळा प्रकरणी निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी अटक करावी असे राऊत म्हणाले. त्यांनी राकेश वाधवान आणि निल सोमय्या यांचा पार्टनरशिपमध्ये चालणारा व्यावसायही सर्वांसमोर मांडला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा भाजप सरकारच्या काळातला हा मोठा घोटाळा असल्याची टीका राऊतांनी केली आहे. (Sanjay Raut Press Conference)

राऊत तोंडावर आपटले?

संजय राऊतांनी साडे-तीन मंत्र्यांची नावं आज सांगणार होते. परंतु त्यांनी ती सांगितले नाही. राऊतांची पत्रकार परिषद ही फुसका बॉम्ब होती त्यापेक्षा आपटी बॉम्ब तरी बरा असतो अशी टीका प्रविण दरेकर यांनी केला आहे. आम्ही योग्य वेळ आली की उत्तर देऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राऊतांचा ट्रेलर फ्लॉप गेला असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे. संजय राऊत ही पत्रकार परिषद घेवून तोंडावर आपटले आहेत. राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही आरोप केले होते. सुधीर मुनगंटीवारांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आणि राऊतांनी सर्व रिसर्च करुन बोलावं असंही मुनगंटीवार म्हणाले.

किरीट सोमय्यांवरती गंभीर आरोप

सोमय्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरती आरोप केले की ठाकरे कुटुंबाचे अलिबागमध्ये १९ बंगले आहेत. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले किरीट सोमय्यांना मी आव्हान करतो की त्यांनी १९ बंगले दाखवावे मी राजकारण सोडून देईल, आपण सर्व पत्रकार त्या १९ बंगल्यामध्ये पिकनीकला जाऊ, जर तिथे बंगले नाही निघाले तर शिवसेना सोमय्यांना जोड्याने मारेल अशी गंभीर टीका राऊतांनी केली आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्यांचा उल्लेख मुंलूंडचा भडवा, दलाल असाही राऊतांनी केला आहे. आनंदराव अडसूळ, भावना गवळी, अनिल परब हे आमचे नेते निर्दोष आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय.

सरकार पाडण्याचा प्रयत्न....

पत्रकार परिषदेच्या सुरवातीला संजय राऊतांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन केले. वर्षा बंगल्यावरुन मुख्यमंत्री पत्रकार परिषद पाहत असल्याचं राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे मला फोन आले आणि 'राऊत तुम आगे बढो' असे म्हणाल्याचंही त्यांनी सांगितले. पाठित वार केले तरी शिवसेना शात बसणार नाही असं राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की बाळासाहेबांनी मंत्र दिला आहे तू काही पाप केलं नसेल गुन्हा केला नसेल, कुणाच्या बापाला घाबरु नको. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. मला भाजपचे काही नेते भेटून बोलले तुम्ही सरकारमधून बाहेर पडा नाहीतर तुम्हाला जाम करु असे आरोप संजय राऊतांनी केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com