अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही - शशिकांत कांबळे प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही - शशिकांत कांबळे

आरोपीने स्वतः पत्रकारांना भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगितले. मात्र हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: कल्याण पूर्वेतील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यातच गाठत अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. पीडित मुलीने आरडा-ओरड केला असता आरोपीने तिथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीने टिळकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. (The accused who molested a minor girl is not a BJP worker said Shashikant Kamble)

हे देखील पहा -

या प्रकरणी टिळक नगर पोलीसांनी पप्पू सहानी नावाच्या आरोपीला अटक ही केली आहे. मात्र आरोपीने स्वतः पत्रकारांना भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगितले. मात्र हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. याबाबत भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलीस उपायुक्त पोलीस गुंजाळ यांची भेट घेत निवेदन दिले. महापालिका क्षेत्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि नेत्या चित्रा वाघ यांनी ही पोलिसांची भेट घेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना कशा थांबविता येतील याची ठोस उपाय योजना करावी याविषयी चर्चा केली होती.

गोविंदवाडी परिसरात काल जी घटना घडली, त्यामध्ये तो भारतीय जनता पार्टीचा असल्याचा उल्लेख होत आहे. मात्र त्याचा आणि भाजपाशी तिळमात्र संबंध नाही. भाजपा पक्षाला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी मागणी भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT