पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप, नवज्याेत सिंह सिद्धू यांनी दिला राजीनामा

पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप झाला आहे. पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप, नवज्याेत सिंह सिद्धू यांनी दिला राजीनामा
पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप, नवज्याेत सिंह सिद्धू यांनी दिला राजीनामाSaam Tv News
Published On

चंदिगढ: पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप झाला आहे. पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काही दिवसांपुर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याजागी दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक असताना अशा राजीनामा नाट्यांमुळे पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. (Political earthquake in Punjab again, Navjot Singh Sidhu resigns)

हे देखील पहा -

नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माणसाचे चारित्र्य अधःपतन तडजोडीने सुरू होते आणि मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी तडजोड करू शकत नाही. मी पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेसची सेवा करत राहतील" असं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सिद्धू नाराज?

नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा देखील धक्कादायक आहे कारण काँग्रेस हायकमांडने त्यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. तसेच, त्यांच्याशी झालेल्या वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले आणि काही तासांतच सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला, यामागे काही महत्वाची कारणे आहेत.

पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भुकंप, नवज्याेत सिंह सिद्धू यांनी दिला राजीनामा
भारत बंदची रॅली काढणे भोवले; नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांची नावे ठरवताना त्यांना हायकमांडने चर्चेत सामील केले नाही, पोर्टफोलिओ ठरवताना त्यांना विचारले गेले नाही आणि डीजीपी आणि मुख्य सचिव यांसारख्या पदांवर नियुक्ती करताना वर्तमान मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांच्याशी सल्लामसलत केली नाही. अशा स्थितीत पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी हायकमांडसमोर नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com