TET पेपरफुटी प्रकरण; आरोपींनी खोटी प्रमाणपत्र जारी केली- पुणे पोलिसांचा खुलासा  Saam Tv
मुंबई/पुणे

TET पेपरफुटी प्रकरण; आरोपींनी खोटी प्रमाणपत्र जारी केली- पुणे पोलिसांचा खुलासा

टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आणखी मोठे रॅकेट असल्याचे समोर येतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : म्हाडा (MHADA) आणि टीईटी (TET) परीक्षांमध्ये गुप्तता भंग झाल्यानंतर सुरू झालेल्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत. परीक्षा परीषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्यापासून सुरू झालेल्या घटनेतील आरोपींच्या यादीत आता आणखी काही मोठ्या नावांचा समावेश होत आहे.

हे देखील पहा-

टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आणखी मोठे रॅकेट असल्याचे समोर येतं आहे. या प्रकरणात पोलिसांनी (police) आणखी दोघांना अटक (Arrested) केली आहे. अश्विन कुमार आणि सुखदेव ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील अश्विन कुमार यांना बंग्ळूरू (Bangalore) मधून ताब्यात घेतलं आहे.

या आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं (Certificates) देणे असे आरोप आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले असून, त्यासाठी तब्बल ५ कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये आणखी आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Elections Result Live Update: नाशिक महानगरपालिकेत कोणी मारली बाजी? वाचा आकडेवारी

Dog Sick Symptoms: कुत्री आजारी पडल्यावर कसं ओळखायचं? प्राणी प्रेमींनी नक्की वाचा

Surendra Pathare-Aishwarya Pathare: बाप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, लेक अन् सून भाजपचे नगरसेवक; पुण्यात कुटुंब जिंकले

Municipal Election Result: सांगली, मिरज महापालिकेत भाजप काठावर पास; फक्त एका जागावर गेम अडला

SCROLL FOR NEXT