The abducted baby Girl was found within eight hours
The abducted baby Girl was found within eight hours रुपेश पाटील
मुंबई/पुणे

Palghar : झोळीतून बाळाचं अपहरण; आठ तासांनंतर खुलासा

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: बोईसर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर मजूरी करणाऱ्या एका महिलेच्या ८ महिन्यांच्या बाळाचं अपहरण (Kidnapped) झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या बाळाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला पालघर लोहमार्ग पोलिसांनी (Palghar Railway Police) अवघ्या आठ तासात पकडून गुन्ह्याची उकल करत आरोपच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेचं बाळ सुरक्षित आणि सुखरूप आहे. (The abducted baby Girl was found within eight hours; Admirable performance of the Palghar Railway Police)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा कन्हैया डामोर ही मजूर आपल्या ८ महिन्यांच्या महिमा या मुलीला बोईसर रेल्वे स्टेशनवर (Boisar Railway Station) झोळीत झोपवून पतीसोबत रेल्वे ट्रॅकवर काम करण्यासाठी गेली होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने या ८ महिन्यांच्या मुलीला (Baby Girl) झोळीतून उचलून तेथून पलायन केले. वर्षासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी महिलेला झोळीत बाळ नसल्याचे समजल्यानंतर तिने वर्षाकडे धाव घेत वर्षाला याची माहिती दिली. वर्षाने हातातले काम सोडून बाळाच्या झोळीकडे धाव घेतली असता तिथे आल्यानंतर तिला बाळ न दिसल्याने ती कावरी-बावरी झाली आणि टाहो फोडू लागली. तातडीने तिने बोईसर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठलं आणि बाळ पळवून नेल्याची तक्रार दिली.

पोलिसांनीही तत्परता दाखवून अज्ञाताने बाळ अपहरण केल्याचा गुन्हा तातडीने दाखल केला. पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर (Naresh Randheer) यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. याच वेळेस मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी येत असलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे (Yogesh Tare) यांना एक जण बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाचा फोटो काढला आणि पोलीस ठाण्यात पाठवला. त्यानंतर हा फोटो त्या बाळाच्या आईला दाखवल्यानंतर हे बाळ आपलेच असल्याचे या महिलेनी ओळखले.

बाळाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने जवान योगेश तरे याला संपर्क साधला आणि अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीला पकडले. अवघ्या आठ तासात ही कारवाई करण्यात आली. बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले असून तो अटकेत आहे. पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी बाळाचा ताबा आई-वडिलांकडे दिला. आपले बाळ मिळाल्याने बाळाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आणि पोलिसांचे आभार मानले. या गुन्ह्यातील आरोपीचा लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या रॅकेटशी संबंध आहे का याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

Prices Of Pulses: डाळींच्या किंमती कडाडल्या!जाणून घ्या,आजचा प्रतिकिलोचा दर किती?

Satara Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत नाही, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही; वयोवृद्ध आजोबांचा निर्धार

Buldhana Crime: लग्नाच्या मिरवणुकीत तुफान राडा! दोन गटात दगडफेक; ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT