Vidhan Parishad Election/ MVA
Vidhan Parishad Election/ MVA Saam TV
मुंबई/पुणे

'आघाडीत विश्वास नसल्यामुळेच तिन्ही पक्ष वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागासाठींचे मतदान ९ वाजता सुरु होतं आहे. शिवाय या निवडणुकीत काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून प्रसाद लाड हे अनुक्रमके शेवटच्या स्थानी आहेत. त्यामुळे आता १० व्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण शेवटचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दोघांकडे पुरेसं संख्याबळ नाहीये.

अशातच राज्यसभेच्या (Rajyasabha) निवडणुकीच्या निकालाप्रमाणे विधान परिषदेचा निकाल देखील भाजपच्याच बाजून लागेल असा विश्वास भाजपचे विधान परिषद उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, 'महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही, आम्ही राज्यसभा जिंकल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, आघाडीने आत्मविश्वास गमावला आहे. शिवाय महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे आम्ही विजयी होवू असं शिंदे म्हणाले.

आजच्या निवडणुकीसाठी भाजपकडून योग्य नियोजन केलं आहे. राज्यसभेच उघड मतदान असताना आमचा विजय झाला. आज तर गुप्त मतदान आहे. शिवाय लोकशाहीत पहिल्यांदाच विरोधीपक्ष सक्षम आणि सत्ताधारी पक्ष फुटताना दिसत आहे आणि गुप्त मतदानामुळे तो फुटेलच, आमचा विश्वास वाढला आहे. मात्र, आघाडीध्ये विश्वास नसल्यामुळे मित्रपक्ष तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये (Hotel) थांबले, तीन वेगळ्या बैठका घेतल्या आणि पवार साहेब रात्रीच निघून गेले असल्याचंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, ९ ते ४ मतदान झाल्यानंतर काय आहे ते समोर येईल, आमच्या मनामध्ये पाचव्या जागेबाबत कोणतीही चिंता नसून आमचे पाचही उमेदवार विजयी होतील असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला आहे. तर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं यावेळी आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT